ब्रेकिंग न्यूज...१० वी, १२वीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर

 

ब्रेकिंग न्यूज...१० वी, १२वीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीरमुंबई:  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची तारीख अखेर आज जाहीर केली आहे. 

"इयत्ता १२ वी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल", अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. तर इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. 
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post