जिल्हा बँकेसाठी विद्यमान चेअरमन गायकर, माजी आ.पिचड यांचे अर्ज दाखल

 


जिल्हा बँकेसाठी विद्यमान चेअरमन गायकर, माजी आ.पिचड यांचे अर्ज दाखलनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अकोलेचे माजी आ.वैभव पिचड तसेच बँकेचे विद्यमान चेअरमन सिताराम गायकर पा.यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली असून मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाची रणनिती निश्चित करण्यात आली आहे. पक्षाने निवडणूक समितीचीही स्थापना केली असून यात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा., माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचा समावेश आहे.

माजी आ.वैभव पिचड यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले की, जिल्हा बँक ही महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक असून सध्या फक्त अर्ज भरुन ठेवला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत निवडणुकीच्या रणनितीबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post