स्वाती अहिरे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड

 स्वाती अहिरे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्डअहमदनगर(प्रतिनिधी)- येथील शिक्षिका स्वाती अहिरे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ व मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी पवार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, राजलक्ष्मी कुलकर्णी, छाया शेळके, लिना धसे, मोहिनी कुलकर्णी, नफीसा शेख, समीना खान, अंजुम खान, सोनवणे, चंद्रलेखा तिपोळे, सोहेल शेख, बापूसाहेब गायकवाड, राम पोटे, प्रविण उकिर्डे, पालवे आदि उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालय येथील शिक्षिका असलेल्या स्वाती अहिरे यांना एकेएस एज्युकेशन अवॉर्ड 2020 चा ग्लोबल टीचर अवॉर्ड ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे नुकताच प्रदान करण्यात आला. यामध्ये 110 देशातील हजारो शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यामधील दिडशे शिक्षकांपैकी अहिरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post