धनंजय मुंडेंवरील संकट दूर व्हावे, समर्थक नगरसेवकाचे दंडवत घालत प्रभू वैद्यनाथाला साकडं

 


धनंजय मुंडेंवरील संकट दूर व्हावे, समर्थक नगरसेवकाचे दंडवत घालत प्रभू वैद्यनाथाला साकडंबीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपकडून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. यादरम्यान मुंडे समर्थक मात्र आपल्या नेत्याच्या पाठिशी ठामपणे उभे असून परळीतील मुंडे समर्थक नगरसेवकाने दोन किलोमीटर लोटांगण घालत प्रभू वैद्यनाथ यांच्या चरणी मुंडेंच्यासाठी साकडं घातलय. धनंजय मुंडे सध्या मोठ्या राजकीय संकटात आहेत. त्यांच्यावरील संकट दूर व्हावे, म्हणून परळी येथील नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी तब्बल दोन किलोमीटर अंतर कापत प्रभू वैद्यनाथाला दंडवत घालत प्रार्थना केली. ढोल ताशांच्या गजरात हे दंडवत घालण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post