मुलांनी चीनी मांजा वापरल्यास पालकांवर गुन्हा दाखल होणार
नाशिक: नायलॉनच्या मांजामुळे होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे कोणत्याही लहान मुलाकडे नायलॉनचा धोकादायक मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई होईल. अशा मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल होईल. पोलिसांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. त्यामुळे आतातरी मांजाच्या वापराला आळा बसणार का, हे पाहावे लागेल. राज्यात नायलॉन मांजाला बंदी असतानाही सर्रासपणे मांजाचा वापर सुरु आहे. मात्र, आता पोलिसांच्या आदेशामुळे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
Post a Comment