पेरु खाण्यावरुन नातीने केली चेष्टा, आजीने स्वत:चे जीवनच संपवले
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरशहरात एक हृद्यद्रावक घटना घडली आहे. या घटनेने सर्वच हळहळले आहेत. येथील एका 60 वर्षीय वृद्ध महिलेने अॅसिड प्राशन केलं आहे. अॅसिड प्राशन केल्याने वृद्ध महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, उपाचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीच्या एका छोट्याशा गोष्टीने ही आजी इतकी दु:खी झाली की तिने हे टोकाचं पाऊल उचललं. पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीने आजीला म्हटलं की, “तुम्ही तर झाडावर लागलेले सगळेच पेरु खाल्ले”. नातीच्या या वक्तव्याने आजी अत्यंत दु:खी झाली आणि तिने रागाच्या भरात अॅसिड प्राशन केलं. याप्रकरणी जिल्ह्यातील बेटमा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Post a Comment