श्रीगोंदा बाजार समिती संचालकाच्या मुलाची आत्महत्या...
नगर : श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे यांनी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ते 35 वर्षांचे होते. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा आहे. शनिवारी पहाटे दौड येथील राहत्या घरी ही घटना घडली. आत्महत्यामागचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. लक्ष्मणराव नलगे यांना सुधीर व दादासाहेब ही दोन मुले आहेत. त्यापैकी दादासाहेब हा दौंड येथील व्यवहार पाहत होता. त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होता. दादासाहेब गेल्या एक महिन्यापासून तणावाखाली होता असे सांगण्यात येत आहे. दादासाहेब याने काही दिवसांपुर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. सोशल मीडीयावर फोटो टाकले. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे.
Post a Comment