कृष्ण प्रकाश यांच्या 'आयर्न मॅन' कामगिरीची 'वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद

 कृष्ण प्रकाश यांच्या 'आयर्न मॅन' कामगिरीची 'वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंदमुंबई : नगरचे माजी पोलिस अधीक्षक व सध्या पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असलेले कृष्ण प्रकाश यांना आयर्न मॅन हा किताब मिळाला आहे. त्यांची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. अशी नोंद होणारे ते पहिले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. हा मान भारतीय सैन्य किंवा निमलष्करी दलातील अधिकाऱ्यांना देखील अद्याप मिळालेला नाही. कृष्णप्रकाश यांनी 20 जानेवारी रोजी सोशल मीडियावर या सन्मानाची  माहिती दिली.कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पोस्टमध्ये हा सन्मान देशाला, भारतीय पोलीस दलातील सहकाऱ्यांना, कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देण्या सर्वांना अर्पण केलाय. त्यांनी 2017 मध्ये आयर्नमॅन ट्रायथलॉन हा जगातील सर्वात आव्हानात्मक एक दिवसीय खेळ प्रकार पूर्ण केला होता. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकाला 3.8 किलोमीटर पोहणे, 180.2 किलोमीटरची सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावावं लागतं. हे सर्व केवळ 16 ते 17 तासांच्या कालावधीत पूर्ण करायचं असतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post