‘या’ ग्रामपंचायतीत वेगळाच पेच, उमेदवार नाही तर ‘नोटा’ला सर्वाधिक मते

 


‘या’ ग्रामपंचायतीत वेगळाच पेच, उमेदवार नाही तर ‘नोटा’ला सर्वाधिक मतेनगर :  : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये  वेगळी लढत पाहायला मिळाली. निवडणुकीत मतदारांनी नोटा बटणालाच अधिक पसंती दिली. उमेदवार शीतल सुग्रीव भोसले यांना 396 मतं मिळाली. तर ‘नोटा’ला चक्क 502 मतं पडली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतं असतात, त्या ठिकाणी ‘नोटा’नंतर सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. त्यानुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवार शीतल भोसले खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकार देविदास घोडेचोर यांनी ही माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post