शिवसेना खासदार व भाजप आमदार समर्थकांमध्ये राडा

 शिवसेना खासदार व भाजप आमदार समर्थकांमध्ये राडावाशिम: वाशिममध्ये शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादानंतर समर्थकांमध्ये राडा झाला. या प्रकरणी खासदार आणि आमदारांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाशिम इथं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्याअगोदर खासदार भावना गवळी आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामध्ये गुंठेवारी शेतकर्‍यांची समस्या निकाली काढण्यावरून चर्चा सुरू होती. त्याचवेळी आमदार राजेंद्र पाटणी तिथे आले होते. त्यावेळी राजेंद्र पाटणी आणि भावना गवळी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.   त्यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम पोलिसात खासदार भावना गवळी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर शहरातील आमदार समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी पाटणी चौकात खासदार भावना गवळी यांचे पोस्टर आणि टायर जाळून निषेध केला. त्याच दरम्यान खासदार समर्थक शिवसैनिक ही घटनास्थळी आले आणि दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post