भंडारा शिशु केअर युनिट आग.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश

 भंडारा शिशु केअर युनिट आग.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेशमुंबई: भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post