परदेशातून भारतात परतलेल्या सलमान खानच्या भावांवर गुन्हा दाखल

 परदेशातून भारतात परतलेल्या सलमान खानच्या भावांवर गुन्हा दाखलमुंबईः अभीनेता सलमान खान याचे बंधू अभिनेता सोहेल खान,  रबाज खान आणि निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडालीय. 25 डिसेंबरला यूएईवरून हे तिघे मुंबईत दाखल झाले होते. परंतु त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवून थेट घर गाठल्यानं त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. अखेर त्या तक्रारीवरूनच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

25 डिसेंबरला यूएईवरून हे तिघे मुंबईत परतल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी ताज लँडमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्यांनी 26 तारखेला या रुम रद्द करून त्यांनी थेट घर गाठले, त्यामुळे पालिकेने साथ नियंत्रण प्रतिबंधक कायद्यात अंतर्गत पोलिसात तक्रार केली. त्या तक्रारीवरूनच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post