शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रीडा सेलच्या अध्यक्षपदी घनश्याम सानप
क्रीडा सेलच्या माध्यमातुन खेळाडुंना चालना मिळावी : आ संग्राम जगताप
अहमदनगर : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी खेळही महत्वाचे आहेत. खेळांमुळे विद्यार्थ्यांचा शारीरीक व बौद्धीक विकास होत असतो. त्यामुळे शहरात क्रीडा सेलच्या माध्यमातून प्रशिक्षीत क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून खेळांना चालना मिळावी, अशी अपेक्षा आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रीडा सेलच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध क्रीडा शिक्षक घनश्याम सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र आ.संग्राम जगताप व शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांच्या हस्ते नुकतेच श्री सानप यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी गट नेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, अमोल काजळे, निखील कुराडे, प्रसाद सामलेटी, तुषार टाक, अमोल बळे, शिव घेगडे, अभिजीत कराळे, रवि वाकळे, निखील वाकळे, विठ्ठल तिवारी, किरण शिंदे, अनुराग पडोळे, प्रकाश वाटमोडे आदी उपस्थित होते.
यावेळी घनश्याम सानप म्हणाले की, पदाच्या माध्यमातून व आ. संग्राम जगताप यांच्या सहकार्यातुन शहरात चांगले खेडाळू निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करणार आहे.
Post a Comment