विरोधकांना मतपेटीतून सणसणीत चपराक, निकालानंतर अक्षय कर्डिले विरोधकांवर बरसले

 

बुहाणनगरकरांनी केले विरोधकांचे डिपॉझीट जप्त

नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व : अक्षय कर्डिलेअहमदनगर :नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव करीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ८५ टक्के  ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी गेली २५ वर्षे विकास कामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला असल्याने हा सर्वसामान्यांचा विजय असल्याचे भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी सांगीतले.


अक्षय कर्डिले पुढे म्हणाले की, बु्हाणनगर ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध होत होती. मात्र फक्त विरोधासाठी विरोध करणारांनी ही लादलेली निवडणुक बुहाणनगरकरांनी परतवून लावीत मुठभर विरोधकांचे डिपॉझीट जप्त केले. समाजात कवडीची किंमत नसणाऱ्यांनी आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेले आरोप केले त्यांना जनतेने
मतपेटीच्या माध्यमातून सणसणीत चपराक दिली असल्याचे अक्षय कर्डिले यांनी विजयोत्सवाच्या वेळी सांगीतले.

जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून सेवेची त्यास आम्ही पात्र ठरून जनतेची आणखी जोमाने सेवा करू असे अक्षय कर्डिले म्हणाले.

यावेळी विजयी उमेदवार सविता तापकिरे, रावसाहेब कर्डिले, शितल धाडगे, वैभव वाघ, निखील भगत, मंगल कर्डिले, दिलावर पठाण,  सरस्वती कर्डिले, मंदा साळवे, भास्कर पानसरे, सविता तरवडे, सुषमा साळवे, स्वाती कर्डिले, जालिंदर जाधव, राजेंद्र पाखरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संदीप कर्डिले, दत्ता तापकिरे, रवि कर्डिले, अमोल धाडगे, दगडू पानसरे, प्रकाश कर्डिले, बाळु भगत, दिपक धाडगे, अण्णा कचरे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post