जाब विचारल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांवर हल्ला, स्थापत्य अभियंत्याचे कृत्य

कामात कुचराई केल्याचा जाब विचारल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांवर हल्ला, स्थापत्य अभियंत्याचे कृत्य

 


बीड : कामकाजात वारंवार कुचराई करत असल्याचा जाब विचारणाऱ्या नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर, स्थापत्य अभियंत्याने चाकू हल्ला केलाय. ही खळबळजनक घटना बीडच्या वडवणीमध्ये रात्री घडलीय. प्रशांत पाटील असं मुख्याधिकाऱ्यांचं नाव आहे. तर सुमित मेटे असं हल्लेखोर अभियंत्याचं नाव आहे. अभियंता मेटे हे सतत गैरहजर राहून लोकांचे काम करण्यास विलंब करत होते. त्यामुळं मेटे यांच्या विरोधात अनेक तक्रारी येत होत्या. यामुळे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी अभियंता सुमित मेटे यांना जाब विचारला होता. हाच राग मनात धरून स्थापत्य अधिकारी मेटे यांनी, वडिलांसह मामाला घेऊन येत, मुख्याधिकारी पाटील यांच्यावर चाकूहल्ला करत मारहाण केलीय. दरम्यान या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post