शिवराष्ट्र सेनेने ‘या’ कारणामुळे पालकमंत्र्यांना दाखवले काळे

 शिवराष्ट्र सेनेने ‘या’ कारणामुळे पालकमंत्र्यांना दाखवले काळे नगर- शहरातील वाहतूकीची समस्या, बंद असलेली सिग्नल यंत्रणा याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने शिवराष्ट्र सेनेने प्रजासत्ताक दिनी नगरमध्ये आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. रस्ते सुरक्षा सप्ताह वाहतुक शाखेकडून राबविलेला जात आहे. परंतु वाहतुकीबाबत शहराची दैयनिय अवस्था झालेली आहे.  शहरात सर्रासपणे ट्रकपासून छोट्या वाहनांपर्यंत भर बाजारात व मोठ-मोठ्या ट्राफिक सिग्नलपाशी ही वाहने दिमाखात उभी असतात. यांच्यावर ट्राफिक पोलिस कुठलिही कारवाई करत नाही. हे मोठे आश्चर्य आहे. गोर-गरीब नागरिकांना फक्त नियम दाखवून पावत्या फाडायचे काम चालू असते. तसेच  जड वाहतुकीला प्रवेश नसतांना सुद्धा ट्राफिक पोलिस ही वाहने दिवसा शहरात सोडतात व त्यामुळे आतापर्यंत 700 ते 800 बळी गेले आहेत, ही शहराची शोकांतिका आहे. तसेच शहरात मोठ-मोठ रस्त्यावर व चौकातील सिग्नलवर मोकाट, भटकी जनावरे कायम उभी असतात. त्यामुळे दुर्घटना होतात, अशी टिका पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post