घरात भूतबाधा असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीसह चौघींवर बलात्कार, भोंदूबाबा गजाजाड

 घरात भूतबाधा असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीसह चौघींवर बलात्कार, भोंदूबाबा गजाजाडनागपूर : मुलीला भूताने पछाडले असून तुमच्या घरात देवाच्या प्रकोपाने मृत्यु होण्याची भिती आहे, असे सांगून अल्पवयीन मुलीसह मुलीची आई, आजी, मामीवर बलात्कार करणार्‍या भोंदूबाबाला पोलिसांनी गजाआड केले आहे. दुलेवाले महाराज नावाने ओळखल्या जाणार्‍या भोंदूबाबाने मुलीवर सहा महिने बलात्कार केला. धमेंद्र विठोबा निनावे ऊर्फ दुलेवाले महाराज बाबा असे अटकेतील भोंदूबाबाचे नाव आहे. पीडिता ही अल्पवयीन असून शिक्षण घेत आहे. तिचे वडील खासगी कंपनीत आहेत. धमेंद्र हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. 17 मे रोजी तो पीडित मुलीच्या घरी आला. तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल, अशी भीती दाखवली. त्यांनी धमेंद्र याला उपाय विचारला.  21 दिवसांची पूजा करावी लागेल,असे धमेंद्र याने पीडित मुलीच्या वडिलांना सांगितले. पूजा केल्यानंतरही भूतबाधा संपली नसून मुलीवर भुताचा अधिक प्रभाव असल्याचे त्याने पीडित मुलीच्या वडिलांना सांगितले. भूत उतरविण्याच्या बहाण्याने तो मुलीला निर्जनस्थळी घेऊन गेला आणि बलात्कार केला. पूजेच्या बहाण्याने त्याने पीडित मुलीसह आईवरही अत्याचार केला.  चंद्रपूर येथेही त्याने दोघींचे लैंगिक शोषण केले. पीडित मुलीची मामी व आजीवरही त्याने अत्याचार केला. एक लाख रुपये खंडणी मागीतली. अत्याचार वाढत गेल्याने पीडित मुलीने नातेवाइकांसह पारडी पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post