नगर शहरासाठी भरीव निधी देण्याचे ना संजय बनसोडे यांचे आश्वासन

 शहरासाठी भरीव निधी देण्याचे ना संजय बनसोडे यांचे आश्वासन

आ. संग्राम जगताप यांच्या कार्यालयास सदिच्छा भेटअहमदनगर : अहमदनगर शहरात विकास कामे तसेच  मोठे प्रकल्प यासाठी  माझ्याकडील विभागांकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन


ना संजय बनसोडे यांनी दिले.ना. बनसोडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर हे नगर येथे आले असता  त्यांनी आ संग्राम जगताप यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.  


ना. बनसोडे म्हणाले की, माझ्याकडील सार्वजनिक बांधकाम, पाणीपूरवठा या खात्यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध प्रकल्प राबविण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार असून त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावेत अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या.राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे (महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे राज्यमंत्री) व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. बसवराज पाटील नागराळकर यांचे नगर शहरात आगमन झाले असता त्यांचे नगर शहराच्या वतीने स्वागत करून सत्कार केला.याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक अविनाश घुले, मा.नगरसेवक संजय चोपडा, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अभिजित खोसे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ रेश्मा आठरे, विपुल शेटिया, सुनील त्रिंबके, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब पवार, विजय गव्हाळे, संभाजी पवार, सुमित कुलकर्णी, संतोष ढाकणे, गौरव बोरुडे, अंजली आव्हाड, साधनाताई बोरुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post