शिवसेना सचिव नार्वेकर यांच्या हस्ते शनिदेवाची महापुजा Video

गणेश मुळे नेवासा

शनिशिंगणापुरात शिवसेना सचिव नार्वेकर यांच्या

 हस्ते शनिदेवाची महापुजा व आरती सोहळा संपन्न
सोनई(वार्ताहर)'शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज नववर्षाच्या निमित्ताने शनिशिंगणापुरला भेट देवून शनिमहाराजांची महापुजा करुन आरती सोहळा केला.    नार्वेकर व परीवाराने उदासी महाराज मठात विधीवत अभिषेक केला.चौथ-यावर जाऊन त्यांनी स्वयंभू शनिमुर्तीला पंचामृतस्नान करत महापुजा केली.

त्यांच्या हस्ते आरती सोहळा करण्यात आला.नार्वेकर यांच्या सुचनेनुसार भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरुच ठेवण्यात आली होती.राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होवो.अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.


  जनसंपर्क कार्यालयात विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी त्यांचा शाल,श्रीफळ व प्रसाद देवून सत्कार केला.जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी देवस्थानच्या कार्याबद्दल माहिती दिली.यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गुगळे,विनायक दरंदले, विश्वस्त भागवत बानकर,माजी कोषाध्यक्ष योगेश बानकर उपस्थित होते.मुळा एज्युकेशन संस्थेच्या अंबराई विश्रामगृह येथे जाऊन त्यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post