सोनगावचे सरपंच पै. अनिल अनाप यांना आदर्श सरपंच पुरस्कार

 सोनगावचे सरपंच पै. अनिल अनाप यांना आदर्श सरपंच पुरस्कार
 सोनगाव- राहुरी तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या सोनगाव  पंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच अनिल नारायण अनाप यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने गौरवण्यात आले आहे .सरपंचांना मार्गदर्शन व काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी 2017 पासून सरपंच सेवा संघाची परिषद घेऊन गावाच्या विकास कामे करणाऱ्या व वेगवेगळे उपक्रम राबवून आदर्श गाव निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंचांच्या कार्याची दखल घेऊन अशा कर्तव्यदक्ष सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 

राहुरी तालुक्यातील सोनगावात सरपंच अनिल अनाप यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबवून गावात मोठी विकास कामे केली आहेत. त्यात त्यांनी भूमिगत गटार योजना, स्ट्रीट लाईट, दलित वस्ती सुधार योजना ,घरकुल योजना यासारख्या विविध विकास कामांना प्राधान्य देत मोठ्या प्रमाणात निधी मिळून गावात विकास कामे केली आहेत. या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे .हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच अनिल अनाप यांचा गावातील पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. सुभाष पाटील अंत्रे, अशोक अंत्रे, शिवनाथ शिंदे , चेरमन राजेंद्र अनाप,उपसरपंच किरण अंत्रे,रोहिदास कानडे, शामराव अंत्रे,रभाजी कानडे, वसंत अंत्रे, चंद्रभान अनाप,सुनील अनाप, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, संजय पांडे,सूर्यभान शिंदे, प्रशांत अंत्रे,भीमराज अनाप,नारायण मेजर, मथाजी अनाप,राजेंद्र अनाप, शैलेश अनाप, कैलास अनाप,संतोष अंत्रे,श्रीपत शिंदे,रमेश अनाप,नरेंद्र अनाप,भारत अनाप,दत्तात्रय अंत्रे, सागर अनाप, सुभाष ब्राह्मणे, नंहुभाई मंसूरी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post