एअरटेलकडूनही ऑनलाईन पेमेंट सेवा सुरु

एअरटेलकडूनही ऑनलाईन पेमेंट सेवा सुरु  मुंबई :   टेलिकॉम कंपनी एअरटेलनेही पेमेंट सर्विसच्या जगात पाऊल ठेवलं आहे. कंपनीने Airtel Safe Pay नावाची सर्विस सुरु केली आहे. ही सर्विस एअरटेलच्या ऑनलाईन बँकिंग सिस्टम Airtel Payments Bank च्या अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. कंपनीच्या वतीनं दावा करण्यात आला आहे की, यामार्फत युजर्सना सेफ ट्रान्झॅक्शन करता येईल. एअरटेलच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, Airtel Safe Pay मध्ये युजर्सच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये युजर्स सुरक्षित पद्धतीने पैसे ट्रान्सफर करु शकणार आहेत. हे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टमहून उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post