कल्याण रोडवर कार व जेसीबीचा अपघात, जिल्हा परिषदेचे सीईओ क्षीरसागर जखमी

 कल्याण रोडवर कार व जेसीबीचा अपघात,   जिल्हा परिषदेचे सीईओ क्षीरसागर जखमीनगर :   नगर-कल्याण महामार्गावरील नांदुरफाटा येथे मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास  कार व जेसीबी यांच्या समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या सह उपजिल्हाधिकारी संदीप निचीत हे जखमी झाले आहेत. क्षीरसागर यांना जास्त मार लागला असून दोघांनाही आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना मिळताच त्यांनी तेथील प्रशांत दाते व रामदास देशमुख यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जात मदतकार्य केले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post