निलेश लंके यांनी आमदारपदाचा दर्जाच घालवला - सुजित झावरे

 पारनेर तालुक्यात सुमारे ६५ ग्रामपंचायती  सुजित झावरे व विजय औटी यांच्या गटाकडे

निलेश लंके यांनी आमदारपदाचा दर्जाच घालवला - सुजित झावरे
नगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांना विधानसभा निवडणुकीतील झंझावात ग्रामपंचायत निवडणुकीत टिकवता आलेला नाही. तालुक्यातील जवळपास ६५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार विजय ॵटी तसेच जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या गटांनी बाजी मारली आहे.

निकालानंतर प्रतिक्रिया देताना सुजित झावरे म्हणाले की,

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माझ्या वासुंदे गावांसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये आमदार स्वत: बूथवर बसून राहणे, पहाटे २ ते ३ वाजेपर्यंत गावात प्रचार करणे हे तालुक्याचे दुर्दैव आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करणे हे त्यांच्या पदाला साजेशे नाही. त्यांनी आमदार पदाचा दर्जा घालवला. आणि म्हणून या तालुक्याने आमदारांच्या हुकूमशाहीला ग्रामपंचायत निवडणूकीत स्पष्टपणे नाकारलेले दिसतेय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post