आकर्षक फिचर्स असलेला नवीन स्मार्टफोन Xiaomi Mi 10i लाँच

आकर्षक फिचर्स असलेला नवीन स्मार्टफोन  Xiaomi Mi 10i लाँच मुंबई : शाओमी कंपनीने नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. शाओमी या कंपनीने भारतात Mi 10i हा स्मार्टफोन लाँच केला आहे. Mi 10 या स्मार्टफोन सीरिजमधील हा चौथा फोन आहे. येत्या 8 जानेवारीपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. तर प्राईम मेंबर्ससाठी हा फोन 7 जानेवारीला उपलब्ध होणार आहे. 

Xiaomi ने Mi 10i स्मार्टफोनचे तीन वेरिएंट लाँच केले आहेत. यातील 6GB+64GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB असे तीन वेरिएंट उपलब्ध आहेत. Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार 999 रुपये इतकी आहे. यात तुम्हाला 6GB+64GB स्टोरेजचा फोन खरेदी करता येऊ शकतो. 6GB+128GB स्टोरेजच्या फोनची किंमत ही 21 हजार 999 रुपये आहे. 8GB+128GB वेरिएंटचा फोन हा 23 हजार 999 रुपये इतका आहे.Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची विक्री ही अमेझॉन इंडिया आणि mi.com वर 8 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post