फर्निचरची रौनक वाढवणार्‍या 'विनियर्स'च्या व्हरायटीला नगरकरांची दाद

 फर्निचरची रौनक वाढवणार्‍या विनियर्सच्या व्हरायटीला नगरकरांची दाद

ग्रीनप्लाय व श्री वर्धमान प्लायवूड आयोजित प्रदर्शन व विक्रीला मोठा प्रतिसाद


     नगर - फर्निचर तसेच आकर्षक इंटेरियरसाठीच सौंदर्य व रूबाब खुलावणारे ग्रीनप्लाय इंडस्ट्रीजचे आकर्षक विनियर्स पाहून नगरकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.  उच्चप्रतिचे विनियर्स प्लायवूड निर्मिती करणारी भारतातील अग्रगण्य ग्रीनप्लाय इंडस्ट्रिजने आयोजित केलेल्या विनियर्स प्लायवूडचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा शनिवारी नक्षत्र लॉन येथे भरविण्यात आले होते. विनियर्सची तब्बल एक हजाराहुन अधिक व्हरायटी असल्याने ग्राहकांना अतिशय चोखंदळपणे निवडीला वाव मिळाला. या प्रदर्शनाचे आयोजन नगरमधील श्री वर्धमान प्लायवूड सेंटर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
     या प्रदर्शनाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्युट ऑफ इंडियन इंटेरइर डिझायनर्स अहमदनगर शाखेचे अध्यक्ष अवतारसिंग हिरा, अमोल खोले, कन्हैय्या गांधी, चंद्रकांत तागड, सौ.कल्पना गांधी, प्रविण टकले, अजय अपुर्वा, प्रल्हाद जोशी, शैलेश सप्रे, संतोष गायकवाड, ग्रीन प्लाय इंडस्ट्रिज् लि.चे सेल्स उपाध्यक्ष श्रीपाद बिडकर, अतुल जाधव, नैनिशा शेख, यतीन पारीख, अभिषेक सिंग, पंकज पांडे,  श्री वर्धमान प्लायवूडचे संचालक शैलेश मुनोत, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संतोष मुथा, संजोग मुथा, योगेश मुनोत, रोनक मुनोत, राज मुनोत, ऋतिक मुनोत आदि उपस्थित होते.
    स्वागत करताना रौनक मुनोत यांनी सांगितले की, नगरमध्ये प्रथमच झालेल्या या प्रदर्शनात इंटेरियर तसेच फर्निचरची शोभा वाढविणारे विनियर्सचे अनेक प्रकार, रंगसंगती, व्हरायटीज, डिझाईन नगरकरांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. आपल्या मनातील इंटेरियर साकारण्यासाठी येथे प्रत्यक्ष निवडीचे पर्याय उपलब्ध करुन दिले होते. मनपसंत विनियर्स नगरमध्येच श्री वर्धमान प्लायवूड सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
     ग्रीनप्लायचे सेल्स उपाध्यक्ष श्रीपाद बिडकर म्हणाले की, ग्रीन प्लाय ही भारतातील नामांकित कंपनी असून विनियर्सच्या खास व्हारायटीजसाठी नावाजली जाते. प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना एकाच छताखाली हजारो व्हारायटीज पाहता आल्या. नवीन बांधकाम केलेल्या तसेच ऑफीस, हॉटेल, घरगुती सजावट शोभिवंत आणि मनमोहक करण्यासाठी ग्रीनप्लायचे विनियर्स अतिशय उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
    सर्वसामान्य ग्राहक, इंटेरियर डेकोरेटर्स, फर्निचर उद्योगातील मंडळींनी प्रदर्शनाला भेट देवून पाहणी केली. पुण्यामुंबईसारख्या महानगरात मिळणारी व्हरायटी व गुणवत्ता नगर शहरातच उपलब्ध झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त करीत कंपनी आणि वर्धमान प्लायवूडचे या प्रदर्शनासाठी कौतुक केले.शेवटी योगेश मुनोत यांनी सर्वांचे आभार मानले. विनियर्सच्या सर्व व्हरायटी नगरमधील स्वस्तिक चौक परिसरातील श्री वर्धमान प्लायवडू सेंटर येथे उपलब्ध आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post