वांबोरीतील सत्कार कार्यक्रमात अजितदादांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना दिला 'हा' सल्ला

 वांबोरी येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कारनगर : अपयशाने खचू नका आणि यशाने हुरळून जाऊ नका, असा सल्ला आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत दिला. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाबासाहेब मिटेल आदी उपस्थित होते.  स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुरोगामी विचारांची पेरणी करत पक्षाला बळकटी देऊयात, असे आवाहन पवार यांनी केले. राष्ट्रवादीने यंदा वांबोरीत परिवर्तन घडवत ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post