मैं हू ना! ...काहीही झालं तरी VRDE चे स्थलांतर होऊ देणार नाही, आ.संग्राम जगताप यांची ग्वाही

मैं हू ना! ...काहीही झालं तरी VRDE चे स्थलांतर होऊ देणार नाही, आ.संग्राम जगताप यांची ग्वाहीनगर : नगरची खास ओळख असलेली, लष्कराच्या अखत्यारीतील सर्वात जुनी व मोठी तसेच अत्यंत महत्त्वाची आणि नगरचे भूषण असलेली वाहन संशोधन व विकास संस्था (व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट - व्हीआरडीई) परराज्यात  स्थलांतरीत होऊ देणार नाही, अशी ग्वाही आ.संग्राम जगताप यांनी दिली आहे. यासंदर्भात दि. ६ जानेवारी २०२१ रोजी व्हीआरडीई येथे आ.जगताप यांनी समस्त कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी व त्यावर अवलंबून असलेल्या अस्थापनेतील कर्मचारी यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर माहिती घेऊन या गंभीर परिस्थितीवर चर्चा केली. 

या प्रश्नी यासंबंधीत अधिकाऱ्यांसह तात्काळ जेष्ठ नेते आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार  यांची भेट घेणार आहे. पवार साहेबांशी या विषयावर माझे प्राथमिक बोलणेही झाले असून केंद्र सरकारकडे देखील याविषयी पाठपुरावा करण्यात येईल. वेळप्रसंगी मोठा लढा उभारू पण व्हीआरडीई मी स्थलांतरित होऊ देणार नाही. नगरचे हे वैभव नगर मध्येच राहील ते कुठेही जाणार नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन मी प्रयत्न करणार आहे, असे आ.जगताप यांनी सांगितले.

याप्रसंगी एस डब्लू पगारे, एम एस पांढरे,  एस आर वाघ,  एस एस अहमद,  डी के परदेशी, के करोसिया, डी डी गाडेकर,  फुलारी, सिव्हिलियन्स एम्प्लॉईज युनियनचे सदस्य तसेच सर्व कर्मचारी, कंत्राटी कामगार उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post