नगरच्या VRDE चे स्थलांतर थांबवावे, आ.निलेश लंके यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट

 नगरच्या VRDE चे स्थलांतर थांबवावे, आ.निलेश लंके यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेटनगर : नगरमधील VRDE संरक्षण संस्था बंद करून ती चेन्नई ला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर आ.निलेश लंके यांनी सदर निर्णय  स्थगिती होण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार  यांची मुंबई येथे भेट घेतली.

VRDE ही संस्था संरक्षण विभागाच्या अंतर्गत येत असून VRDE संस्थेच्या देशभरात ५२ शाखा असून त्यापैकी १ शाखा आपल्या पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील अरणगाव येथे आहे.  या संस्थेने आजतागायत संरक्षण विभागासाठी मोठया प्रमाणात रिसर्च केलेले आहे. केंद्र सरकार ही संस्था लवकरच बंद करून सर्व कर्मचारी यांना परराज्यात हलवण्याचे ठरविले आहे.

तरी या निर्णयामुळे अहमदनगर मधील १००० कुटूंबियाचे नुकसान होणार असून अहमदनगर शहरालगत असलेल्या खेडेगावातील विकास देखील खुंटला जाणार आहे.

त्यामुळे सदर संस्था स्थलांतर होऊन नये म्हणून योग्य पाठपुरावा करावा अशी विनंती आ.लंके यांनी पवारांकडे केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post