VRDE वाचवण्यासाठी संरक्षणमंत्र्यांशी लवकरच चर्चा, आ.निलेश लंके यांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट

 VRDE वाचवण्यासाठी संरक्षणमंत्र्यांशी लवकरच चर्चा

आ.निलेश लंके यांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेटनगर : आ.निलेश लंके यांनी VRDE संस्थेच्या कामगार वर्गाची अहमदनगर येथे भेट घेतली व दिलासा दिला.

अहमदनगर येथील VRDE संस्था स्थलांतरित करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाने कामगार वर्गात असलेल्या भीतीच्या वातावरणाने कामगार वर्ग भयभीत असल्याने आ.लंके यांनी कामगार वर्गाची भेट घेऊन त्याना धीर दिला. सदर संस्था स्थलांतरित करून नये अश्या आशयाचे पत्र  ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देण्यात आले असून त्यांनी देशाचे संरक्षण मंत्री  राजनाथसिंह यांच्या सोबत चर्चा करून या गोष्टीवर लवकरात लवकर कामगार वर्गाच्या हिताचा निर्णय घेण्यास केंद्र सरकारला आपण भाग पाडू असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती लंके यांनी दिली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post