खा. डॉ.सुजय विखे यांची VRDE ला भेट, संस्थेच्या स्थलांतराच्या चर्चेला पूर्णविराम

खा. डॉ.सुजय विखे यांची VRDE ला भेट, संस्थेच्या स्थलांतराच्या चर्चेला पूर्णविरामनगर : खा. डॉ.सुजय विखे यांनी नगर येथे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेले व्ही.आर.डी.ई या संस्थेला भेट दिली. गेल्या पन्नास हून अधिक वर्ष  व्ही.आर.डी.ई देशाच्या  संरक्षणात अतिशय महत्वाची कामगिरी बजावत आहेत. 

 गेल्या काही महिन्यांपासून काही वृत्तपत्रांच्या माध्यमांतून व्ही.आर.डी.ई  बंद होणार अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्या संदर्भात दिल्ली येथे दोन दिवसांपूर्वी डी. आर. डी. ओ. च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन व्ही.आर.डी.ई बंद होण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. डी. आर. डी. ओ. च्या सर्व अधिकाऱ्यांनी  व्ही.आर.डी.ई चे कुठेही स्थलांतर होणार नाही अशी ग्वाही दिली. 

यावेळी  व्ही.आर.डी.ई च्या माध्यमातून देशाच्या संरक्षणासाठी योगदान दिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे खा.विखे आभार मानले.

याप्रसंगी अहमदनगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे,  व्ही.आर.डी.ई चे डायरेक्टर संगम सिन्हा, जिल्हा परिषद सदस्य  संदेश कार्ले, माजी नगरसेवक धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post