भीषण अपघात,वर्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला,

रायगडमध्ये वर्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळलारायगड : रायगडमध्ये वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर या ट्रकला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की हा ट्रक थेट 300 फूट दरीत कोसळला. यात 30 ते 40 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.संध्याकाळी साधारण 6.30 च्या सुमारास काही वऱ्हाड्यांचा ट्रक रत्नागिरीतून पोलादपूर येथे येत होता. त्यावेळी पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील अपघाती वळणावर या ट्रकला भीषण अपघात झाला. या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडली असल्याने बचाव कार्यादरम्यान अडथळा येत आहे.जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. तसंच रक्ताची गरज भासेल यासाठी ब्लड बँकेलाही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post