'यांना' नाही मिळणार करोनाची लस : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

 

'यांना' नाही मिळणार करोनाची लस : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरणमुंबई: अठरा वर्षांपेक्षा कमी वय असणारे, गरोदर महिला आणि अ‌ॅलर्जी असणाऱ्यांना लस देण्यात येणार नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस दिली जाईल. शासकीय आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणात पुढाकार घ्यावा. कोरोना लसीला नाही म्हणू नका, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. जगभर कोरोना लसीकरणचा कार्यक्रम सुरु आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतर क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत लस सुरक्षित असल्याचा संदेश पोहोचवा, असंही ते म्हणाले.पहिल्या टप्प्यात आपल्याला 55 टक्के लोकांना पुरेल इतकी लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. सद्यपरिस्थितीत महाराष्ट्राला 17 लाख 50 हजार डोस गरजेचे आहेत. महाराष्ट्राला सध्या 9 लाख 50 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. भारत बायोटेककडून 20 हजार डोस उपलब्ध झालेत. यामुळे 55 टक्के लोकांना लस देण्यात येईल. लसीचे दोन डोस देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला लस देणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post