'या' कारणासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना नगर भेटीचे निमंत्रण

उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना नगर भेटीचे निमंत्रण नगर : खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  यांची भेट घेऊन व्हीआरडीई बद्दल झालेल्या सर्व कामांची त्यांना माहिती दिली. तसेच येणाऱ्या अधिवेशनात व्हीआरडीई संदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याची त्यांना विनंती केली.

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलासाठी संरक्षण मंत्रालयाने तात्काळ परवानगी दिल्याने प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली व येणाऱ्या महिनाभरात माननीय संरक्षण मंत्री  राजनाथ सिंगजी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन व्हावे अशी ईच्छा व्यक्त करून त्यांना सदरचे निमंत्रण खा.विखे यांनी दिले.

तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संरक्षण विषयक आणि कॅन्टोन्मेंट झोन बद्दलचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले असता याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post