उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांना 'टाईम्स मॅन ऑफ दि इअर' पुरस्कार
नगर : टाईम्स ऑफ इंडिया प्रकाशनाच्या 'टाईम्स मॅन ऑफ दि इअर' पुरस्कारासाठी यंदा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांची निवड झाली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला असून त्यात नगर जिल्ह्यातील एकमेव फिरोदिया यांचा समावेश आहे.
‘एक्सलन्स, परफेक्शन अँड पॉवर'अशा संकल्पनेवर हा सन्मान करण्यात आला आहे. आपली क्षमता आणि सामर्थ्याचा समाजाच्या विकासासाठी अधिकाधिक वापर करणाऱ्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. नरेंद्र फिरोदिया यांनी 'सक्षम भारत' हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध नावीन्यपूर्ण कल्पना सार्वजनिक स्वरुपात प्रत्यक्षात आणून विकासाला चालना दिली आहे. 'आय लव्ह नगर' या संकल्पनेतून त्यांनी नगर शहराच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले असून, या संकल्पनेच्या आधारावर 'लेटस्अप', 'लेटस्फिक्स' अशा डिजिटल समाजमाध्यमांद्वारे ही चळवळ अधिक सक्षम करण्यात आली आहे.
टेलिकॉम, रिअल इस्टेट, करमणूक, वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान असे स्वतःचे विविध व्यवसाय विकसित करतानाच सामाजिक, सार्वजनिक व क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांना त्यांनी भक्कम पाठबळ दिले.
वैद्यकीय, शैक्षणिक, सह अभ्यासक्रम, क्रीडा या क्षेत्रात उपेक्षितांना भरीव सहाय्य केले. या पार्श्वभूमीवर टाईम्स प्रकाशनाने त्यांचा गौरव केला आहे
Post a Comment