शिवराज्याभिषेक दिन 'स्वराज्य दिन' म्हणून साजरा होणार

 शिवराज्याभिषेक दिन 'स्वराज्य दिन' म्हणून साजरा होणार



मुंबई: महाराष्ट्राचं आराध्य दैवत  छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (६ जून)यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे या वर्षीपासून छत्रपतींचा राज्याभिषेक दिन हा "स्वराज्य दिन" म्हणून साजरा केला जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

रायगड किल्ल्यावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. आता हा दिवस संपूर्ण राज्यभर साजरा केला जाणार आहे. या  दिवशी ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर गुढी उभारली जाणार असून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post