VRDE स्थलांतरास खा.सुप्रिया सुळे यांचाही विरोध, PMO कडे केली 'ही' मागणी

 VRDE स्थलांतरास खा.सुप्रिया सुळे यांचाही विरोध, PMO कडे केली 'ही' मागणीनगर : नगरमधील VRDE संस्था चेन्नईला हलवण्यात येणार असल्याची चर्चा असून राज्यातील हा महत्त्वाचा प्रकल्प स्थलांतर करण्यास स्थानिकाचा तीव्र विरोध आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या मुद्यावर आक्रमक होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरमधील सदर संस्था अन्यत्र हलवण्यास विरोध दर्शवत पंतप्रधान कार्यालयाकडे निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी ट्वटिटरवर केली आहे. 

खा.सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, 

अहमदनगर शहराची खास ओळख असणारी व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्हिआरडीए) ही संस्था चेन्नई येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याचे वृत्त वाचण्यात आले.ही संस्थेचा अहमदनगर शहराच्या विकासात अतिशय मोलाचा वाटा असून १९४७ पासून ही संस्था येथे अतिशय उत्तम रीतीने काम करीत आहे.हे अतिशय दुर्दैवी असून याबाबत फेरविचार करावा ही नम्र विनंती. मा.संरक्षणमंत्री राजनाथसिंहजी, ही संस्था चेन्नईला गेल्यास सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची विनाकारण फरफट होणार आहे.याशिवाय शहराच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी संस्था बाहेर जाणार आहे.येथील व्हिआरडीएच्या अखत्यारीतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण संशोधने केली आहेत.देशाच्या संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि इतर आवश्यक सामुग्री येथे विकसित झाली आहे.याशिवाय वाहनांची गुणवत्ता तपासून त्यांना प्रमाणित करणारा विशेष ट्रॅकही या संस्थेत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post