ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग

 ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याच्या रागातून महिलेचा विनयभंगश्रीगोंदा  : तालुक्यातील बांगर्डे याठिकाणी  ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पॅनलला मतदान न करता विरोधी पक्षाच्या पॅनेलला मतदान केले म्हणून घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                  श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे याठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून गावातील काही इसम विनाकारण शिवीगाळ करीत असल्याचा आरोप गावातील महिलेने केला असून दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी अनिल बाबू थोरात व बाळू पिराजी थोरात हे दोघे जण आले. त्यांनी फिर्यादीस म्हटले की,तू आमच्या ग्रामपंचायत पॅनलला मतदान केले नाही. तेव्हा फिर्यादीने त्यांना सांगितले की, मी तुमच्याच पॅनलला मतदान केले आहे. त्यावेळीच अनिल थोरात व बाळू थोरात हे दोघे म्हणाले की तुम्ही खोटे बोलत आहात असे म्हणत त्याने महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी फिर्यादी महीलेनी मोठ्यामोठ्याने आरडाओरड केली असता महिलेचा पती मध्ये पडला. त्यावेळी बाळू पिराजी थोरात यांनी हातातील गजाने महिलेच्या पतीच्या हातावर मनगटावर व पायाच्या पिंडरी वरती गजाने मारहाण केली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामराव टिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पितळे हे करत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post