नगरमध्ये साकारणार २८.५०कोटींचा महत्त्वपूर्ण प्रकल्प


पाणी योजनेसाठी सौरउर्जा प्रकल्‍प, महानगरपालिकेत आढावा बैठक



 

नगर : खा.डॉ.सुजय विखे पा. यांनी अहमदनगर महानगरपालिकेमध्‍ये सौर उर्जा प्रकल्‍पाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मा.महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे , स्‍थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, उपायुक्‍त प्रदिप पठारे, सिनारे, लांडगे, राऊत, नगरसेवक कुमार वाकळे, स्‍वप्निल शिंदे, शहर अभियंता इथापे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, विद्युत विभाग प्रमुख मेहेत्रे, अभियंता गाडळकर, रोहोकले, जोशी, .निंबाळकर, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखील वारे, बाळासाहेब पवार, विलास ताठे, संजय ढोणे, मेडाचे अधिकारी व एमएसईबीचे अधिकारी आदी उपस्थित होते.

      यावेळी मा.खा.डॉ.श्री.सुजय विखे पा. यांनी सांगितले की, मा.शासनाकडून सौरउर्जा प्रकल्‍पासाठी 28 कोटी 50 लाख रूपये मंजूर झाले आहेत. परंतु मागील वर्षी कोरोनाची परिस्थिती उदभवल्‍यामुळे सदर प्रकल्‍पाला गती मिळाली नाही. त्‍यासाठी बैठक आयोजीत केली आहे.  मनपा पाणी पुरवठयापोटी एमएसईबीला अंदाजे 1 कोटी ते सव्‍वा कोटी पर्यत दरमहा बील भरते. सदर प्रकल्‍पामुळे मनपाचे मोठया प्रमाणात रक्‍कम वाचणार आहे. मेडाने 6 कोटी 50 लाख रूपयाचा प्रस्‍ताव तयार केला आहे. उर्वरित रक्‍कम रूपये 21 कोटी 50 लक्ष रूपयाचा प्रस्‍ताव मेडाने तयार करण्‍याच्‍या सुचना मा.खा.डॉ.श्री.सुजय विखे यांनी दिल्‍या. त्‍यासाठी मा.शासनाकडून मंजूरी आणू असे सांगितले. याबाबत उर्जामंत्री यांचेसमवेत देखील बैठक घेवून मनपाकडे असलेली थकबाकी माफ करण्‍यासाठी तसेच सदर प्रस्‍तावास मंजूरीकामी प्रयत्‍न करण्‍यात येईल. सदरचे सौर उर्जा प्रकल्‍प मुळा डॅम , विळद, नागापूर, वसंत टेकडी, केडगांव, आगरकर मळा, नालेगांव, डॉन बास्‍को, बुरूडगांव रोड, बोल्‍हेगांव  येथे बसविण्‍यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post