मोठी बातमी...स्कूल चले हम...'या' तारखेपासून ५ वी ते ८वीचे वर्ग सुरू होणार

 

५ वी ते ८वीचे वर्ग २७ जानेवारी पासून मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत महत्वाची बातमी असून राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा  या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत.या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांना केली. झी मराठी वृत्तवाहिनीने सदर वृत्त दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post