आजही एका फोनवर विकासकामे मार्गी लागतात, तालुक्यात ५० सरपंच भाजपचे होतील

 ग्रामपंचायत संदस्यानी वॉर्ड विकासाकडे लक्ष द्या - माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेनगर - तालुक्‍यातील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यानी वॉर्ड विकासाकडे लक्ष केंद्रीत करून गावच्या विकासाला चालना द्यावी. गावचा विकास झाल्यास राज्याच्या विकासाला चालना मिळते. शासनाच्या विविध योजना गावापर्यंत घेऊन जाण्याचे काम प्रत्येक सदस्यांनी करावे.
 विकास निधी कसा आणायचा हे मला माहित आहे. सर्वशासकीय अधिकारी विकास कामासाठी मला नेहमी मदत करत असतात.माझे आजही फोनवरच विकास कामे मार्गी लागत असतात. सरपंच पदाच्या सोडती नंतर नगर तालुक्यामध्ये भाजपाचे सुमारे पंन्नास सरपंच
निवडले जातील, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायत सदस्यांचा सत्काराप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते. या वेळी बाजार समितीचे माजी सभापती हरीभाऊ कर्डिले, विलास शिंदे, अनिल कंराडे, शरद पवार, उद्धव अमृते, रवि अमृते, नामदेव शिंदे, मच्छिद्र शिंदे, संभाजी वामन, बापू तागड,संजय जपकर, सुभाष गुजाळ, प्रदिप टेमकर, देविदास टेमकर, बबन नाट, कोंडीराम नाट, दत्ता तापकिरे आदिसह सदस्य मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

हरिभाऊ कर्डिले म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या कामाची पद्धतीचे संस्कार आमच्यावर झाल्यामुळेच आम्हीही गावामध्ये काम करीत आहे. त्यामुळेच तीस तीस वर्ष गावच्या सत्ता आमच्याच ताब्यात आहे. 
विलास शिंदे म्हणाले की, माझ्यासारख्याला बाजार समितीच्या सभापतीपदाची संधी दिली.त्या माध्यमातून बाजार समितीच्या विकासाला चालना दिली.नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यात नावलौकीक आहे. 
उद्धव अमृते म्हणाले की, निवडणूकांमध्ये जय पराजय होत असतो.परंतु राजकारणातील प्रत्येक व्यक्तीने जनतेचे प्रश्‍न सोडवत राहिल्यास जनता बरोबर राहते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post