आव्हानात्मक लिंगाणा किल्ला सर करणार्या गिर्यारोहकांचा सत्कार

  आव्हानात्मक लिंगाणा किल्ला सर करणार्या गिर्यारोहकांचा सत्कारनगर : गिर्यारोहणाची आवड असलेल्यांसाठी अतिशय आव्हानात्मक असलेला पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील लिंगाच्या आकाराचा अभेद्य असा लिंगाणा किल्ला सर करण्याची कामगिरी नगरमधील तिघा युवकांनी केली आहे. इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या माध्यमातून अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या अजय गांधी, देवेंद्र वैद्य, भागवत अधापुरे यांनी 2969 फूट उंचीवरील हा किल्ला सर करून तिथे भगवा झेंडा रोवला. चढाईसाठी अतिशय कठिण असलेला लिंगाणा सर करताना शारीरीक व मानसिक क्षमतेची कसोटी लागते. नव्या वर्षाची सुरुवात या अवघड ट्रेकिंगने करून तिघांनीही नगरची मान उंचावली आहे. या तिघा गिर्यारोहकांचा आ.संग्राम जगताप यांनी सत्कार करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post