नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर...वाचा सविस्तर

 नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर



नगर : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्वांचं लक्ष लागलेल्या सरपंच आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली आहे. नगर तालुक्यातील 105 गावांतील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाली. सरपंच आरक्षणाची सोडत  प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी तहसीलदार उमेश पाटील ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत बारवकर उपस्थित होते. 


सरपंच आरक्षण पुढील : 

अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला) :  बाबुर्डी घुमट, रांजणी, पारेवाडी, सारोळा बद्धी, पिंपळगाव माळवी, भोयरेखुर्द, गुंडेगाव, रुईछत्तीशी.


अनुसूचित जमाती प्रवर्ग (व्यक्ती) : कर्जुनेखारे, शिराढोण, दशमीगव्हाण, गुणवडी, उदरमल, घोसपुरी, खातगाव टाकळी, हमीदपूर.


अनुसूचित जमाती प्रवर्ग : धनगरवाड (महिला), बुरुडगाव (महिला), पिंप्री घुमट (व्यक्ती).


नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : भातोडी पारगाव, राळेगण , बाराबाभळी, कौडगाव, पिंपळगाव वाघा, कापूरवाडी, पिंपळगाव उज्जैनी, देवगांव, दरेवाडी, निमगाव वाघा, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, शेंडी, पिंपळगाव लांडगा.


नागरिकांचा मागास प्रवर्ग (व्यक्ती) : माथणी/बाळेवाडी, मदडगाव, सोनेवाडी, नवनागापूर, वडगाव तांदळी, चास, वाटेफळ, हिवरे झरे, मांडवे, आंबिलवाडी, वाळकी, टाकळी काझी, साकत खुर्द, सोनेवाडी(चास).


सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) : डोंगरगण, वारुळवाडी, बारदरी, नारायणडोहो, हिंगणगाव, नेप्ती, आठवड, दहिगाव, मजले चिंचोली, निमगाव घाणा, जेऊर, निंबोडी, कोल्हेवाडी, टाकळी खातगाव, भोयरे पठार, वडारवाडी, रतडगाव, आगडगाव, वाकोडी, हिवरे बाजार, वडगाव गुप्ता, देहरे, उक्कडगाव, पिंपळगाव कौडा, मेहेकरी, बहिरवाडी, देऊळगाव सिद्धी, इसळक, मांजरसुंबा.


सर्वसाधारण प्रवर्ग : नांदगाव, इमामपूर, अरणगाव, खंडाळा, पारगाव मौला, हातवळण, नागरदेवळे, चिचोंडी पाटील, भोरवाडी, आव्हाडवाडी, सांडवे, अकोळनेर, बुर्‍हाणनगर, पोखर्डी, खोसपुरी, पारगाव भातोडी, खांडके, पांगरमल, तांदळी वडगाव, शिंगवे, विळद, जखणगाव, वाळूंज, निंबळक, मठपिंप्री, ससेवाडी, कामरगाव, शहापूर केकती, खडकी. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post