निकाल जाहीर, आता सरपंच आरक्षण सोडत कधी? ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

 

निकाल जाहीर, आता सरपंच आरक्षण सोडत कधी? ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्यकोल्हापूर :  राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रियाही लवकरच होणार आहे. सरपंच पदासाठी आरक्षण सोडत अद्याप निश्चित होते बाकी आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण काढू, असं वक्तव्य केलं आहे. पुढच्या एक महिन्यात हे आरक्षण काढलं जाईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने हे आरक्षण रद्द करत निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढली काढण्याचा निर्णय घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post