नगर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत गुरुवारी 'येथे' होणार

 नगर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत गुरुवारीनगर : सन २०२०-२०२५ करीता अहमदनगर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि.२८ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. अहमदनगर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य सर्व नागरिक तसेच ग्रामपंचायत मतदार यांना कळविण्यात येते की,सन २०२०-२०२५ या कालावधीकरीता मा.जिल्हाधिकारी यांचेकडील दि.२२/१/२०२१ अन्वये ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असुन त्यानुसार नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षणाची सोडत राजश्री शाहु हॉल,न्यु आर्टस कॉलेज,अहमदनगर या ठिकाणी गुरुवार दि.२८/१/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता मा.उपविभागीय अधिकारीनगर भाग अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करणेत आलेली आहे. याची सर्वानी नोदं घ्यावी, असे नगर तालुका तहसीलदार यांनी कळवले आहे..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post