दूध उत्पादक शेतक-यांचे नेते गुलाबराव डेरे यांचे निधन

 दूध उत्पादक शेतक-यांचे नेते गुलाबराव डेरे यांचे निधननगर : अहमदनगर जिल्हा दुध कल्याणकारी संघाचे अध्यक्ष व दूध उत्पादक शेतक-यांचे नेते गुलाबराव डेरे यांचे पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अल्प आजाराने निधन झाले आहे. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, ३ मुली असा परिवार आहे. दूध व्यवसाय व शेतकऱ्यांचा प्रश्नांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दूधाच्या प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. त्यांनी पारनेर मतदार संघातून एकदा विधानसभा निवडणुकही लढवली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post