सॅमसंगच्या ‘या’ मोबाईलसोबत चक्क 3849 रुपयांचा कव्हर फ्री

सॅमसंगच्या ‘या’ मोबाईलसोबत चक्क 3849 रुपयांचा कव्हर फ्री नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी १४ जानेवारी रोजी सॅमसंग गॅलेक्सी एस२१ सीरीजला लाँच करणार आहे. कंपनी नवीन गॅलेक्सी एस२१ सीरीज अंतर्गत Galaxy S21, गॅलेक्सी एस २१ आणि गॅलेक्सी एस २१ Ultra स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने गॅलेक्सी एस २१ डिव्हाइसेजसाठी प्री-बुकिंग घेणे सुरू केले आहे. प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी ३ हजार ८४९ रुपयांचा कव्हर फ्री देणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा कंपनीची एस सीरीज अंतर्गत लाँच होणारा पहिला फोन आहे जो एस पेन सोबत येणार आहे. आतापर्यंत S-Pen केवळ Galaxy Note आणि Tab सीरीज सोबत येत होता. इच्छूकांनी सॅमसंग इंडियाच्या ई-स्टोर www.samsung.com किंवा Samsung Shop App वर जावू शकता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post