विधानसभा जिंकली, आ.रोहीत पवारांनी राम शिंदे यांना दिली नवी चप्पल

 आ.रोहित पवार यांनी कार्यकर्त्याला दिली नवी चप्पलनगर : आवडत्या नेत्यासाठी  काही पण, असं करणारे अनेक कार्यकर्ते आजुबाजुला सहज दिसून येतात. कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील राम बन्सी शिंदे या कार्यकर्त्यांने रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा नवस केला होता. त्यांची ही इच्छा निवडणुकीत पूर्ण झाली. यानंतर आ.रोहीत पवार यांनी नुकतीच शिंदे यांची भेट घेतली व त्यांना नवी चप्पल दिली व ती पायात घालायला लावली.

याबाबत आ.पवार यांनी सांगितले की, 

माझ्या आमदारकीसाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी अनेक गोष्टींचा त्याग केला होता. त्यापैकीच थेरगाव इथले राम बन्सी शिंदे हे एक. निवडणुकीत मला यश मिळावं म्हणून त्यांनी चप्पल घालणं सोडलं होतं. काल त्यांची कृतज्ञतापूर्वक भेट घेऊन नवीन चप्पल दिली आणि त्यांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post