जिल्हा बँकेसाठी आ.मोनिका राजळे यांचा अर्ज दाखल, बिनविरोध निवडून येण्याचा विश्वास.. Video

 जिल्हा बँकेसाठी आ.मोनिका राजळे यांचा अर्ज दाखल, बिनविरोध निवडून येण्याचा विश्वासनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आ.मोनिका राजळे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाथर्डी तालुका सेवा संस्था मतदार संघातून त्यांनी अर्ज दाखल केला आहे. ठरावानुसार मतदानाचा हक्क मिळालेले ८४ पैकी ८० मतदार आपल्या बाजूने असून ही निवडणूक बिनविरोध जिंकू असा विश्वास आ.राजळे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी विष्णूपंत अकोलकर, खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष बर्डे, सुभाष केकाण, सुनिल परदेशी, शिवाजी मोहीते ,नगरसेवक नामदेव लबडे, सोमनाथ खेडकर, माणिक खेडकर, जमीर आतार, भगवान साठे, धनंजय बडे, संध्या आठरे, काशिबाई गोल्हार, मनिषा वायकर ,गोकूळ दौंड, सुनील ओहळ, बाबासाहेब ढाकणे, चारुदत्त वाघ, जे. बी. वांढेकर आदी उपस्थित होते.Video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post