चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीप मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा
पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाची कारवाई
दोन पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलांची सुटका व एक आरोपी ताब्यात
नगर : पोोलि उपअधीक्षक संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप (चिंचोली फाटा, ता.राहुरी) येथे हॉटेल चालक सुनिल रामचंद्र हारदे हा पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली असून आरोपी सुनिल रामचंद्र हारदे यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.
*सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके , PI गाडे, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी, अण्णासाहेब चव्हाण, राधिका कोहकडे, पो का रवींद मेढे ,सुनील शिंदे ,सचिन ताजणे, सचिन लोंढे यांच्या पथकाने केली.*
Post a Comment