राहुरी तालुक्यात तनपुरे यांचा वरचष्मा, वांबोरी, उंबरेत मोठा विजय

 

राहुरी तालुक्यात तनपुरे यांचा वरचष्मा, वांबोरी, उंबरेत मोठा विजयराहुरी (राजेंद्र उंडे): राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. बहुतेक ग्रामपंचायतीवर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. अति महत्वाच्या वांबोरी, राहुरी खुर्द, उंबरे, वळण, गुहा, सात्रळ या ग्रामपंचायतीवर तनपुरेंनी वर्चस्व स्थापन केले आहे. आणि विखे- कर्डिले यांच्या गटांना धक्का दिला. तर चेडगांव येथे नंदा दिपक ताके यांना नशिबाने साथ दिल्याने त्या चिठ्ठीवर निवडून आल्या. 

        १५ जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतच्या मतदान प्रक्रियेनंतर उमेदवार व कार्यकर्त्यांची उत्सूकता शिगेला पोहचली होती. आज दिनांक १८ जानेवारी रोजी शहरातील स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय येथे सकाळी नऊ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी एम एम फकीर, तहसिलदार फसियोद्दीन शेख व पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. महाविद्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच निकाल ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. या निवडणुकीत प्रामुख्याने उंबरे ग्रामपंचायतकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याठिकाणी विखे- कर्डिले गटावर मात करून तनपूरे गटाने बाजी मारली. विखे- कर्डिले गटाला ६ तर तनपूरे गटाला ११ जागा मिळाल्यात. त्याप्रमाणेच राहुरी खुर्द येथे अनेक वर्षांनंतर सत्तांतर होऊन 
तनपूरे गटाने नऊ जागेवर बाजी मारली. तर विखे- कर्डिले गटाला सहा जागा मिळाल्या. अशाच प्रकारे अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन बहुतांश ठिकाणी तनपूरे गटाने वर्चस्व निर्माण केले. 
        चेडगांव येथील नंदा दिपक ताके यांना नशिबाने साथ दिल्याने त्या विजयी झाल्या. याठिकाणी नऊ जागेपैकी एक जागा बिनविरोध झाली होती. तर आठ जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली. या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मधील नंदा दिपक ताके व परसराम नारायण हापसे यांना ९९४ असे समान मतदान झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिठ्ठ्या केल्या व एका छोट्या मुलाच्या हाताने एक चिठ्ठी काढली. यामध्ये नंदा दिपक ताके यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. गणेगाव येथे कर्डिले गटाने बाजी मारली. विजयानंतर गुलालाची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक उमेदवार व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली.
           पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथील दहशतवादी विरोधी पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे, राहुरी येथील पोलिस उप निरीक्षक गणेश शेळके, मधुकर शिंदे, निरज बोकिल, निलेश वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी राहुरी येथील ३९ पोलिस कर्मचारी, नगर येथील ३० तसेच १० गृहरक्षक दलाचे जवान असे एकूण ७९ कर्मचारी तैनात होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post